एकाच डॉक्टरवर आरोग्य सेवेचा भार

By Admin | Updated: April 2, 2015 01:48 IST2015-04-02T01:48:52+5:302015-04-02T01:48:52+5:30

दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासीबहुल अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा भागात आरोग्याच्या खासगी सोयीसुविधा नाही.

The burden of health service on the same doctor | एकाच डॉक्टरवर आरोग्य सेवेचा भार

एकाच डॉक्टरवर आरोग्य सेवेचा भार

जिमलगट्टा : दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासीबहुल अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा भागात आरोग्याच्या खासगी सोयीसुविधा नाही. त्यामुळे जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. गट ‘ब’ च्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर या केंद्राच्या आरोग्य सेवेचा भार आहे.
गट ‘ब’ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांढरे हे जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. या ठिकाणचे गट ‘अ’ चे एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरल्याचे शासनाकडून दाखविण्यात आले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. परिणामी येथील आरोग्य सेवा ढासळली आहे. यासंदर्भात जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे अनेकदा रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासन व प्रशासनाने या ठिकाणचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद भरण्यात आले नाही.
येथे असलेल्या एकाच डॉक्टरला अनेक बैठकांसाठी जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अनेक रुग्ण पुरेशा औषधोपचाराअभावी परत जातात. रिक्त पद न भरल्यास केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पुलयाजी वेलादी यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: The burden of health service on the same doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.