गोटूल नव्याने बांधून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 01:42 IST2016-04-10T01:42:06+5:302016-04-10T01:42:06+5:30
कोठी हे भामरागड तालुक्यातील मोठे व मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी गोटूल बांधून देण्यात यावे,

गोटूल नव्याने बांधून द्या
कोठीवासीयांची मागणी : प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
भामरागड : कोठी हे भामरागड तालुक्यातील मोठे व मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी गोटूल बांधून देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या गावातील जुने गोटूल मोडकळीस आले असल्याने नवीन गोटूलची इमारत बांधण्याची जोर धरत आहे.
आदिवासी संस्कृतीमध्ये गोटूलला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील प्रत्येक आदिवासीबहुल गावामध्ये गोटूलच्या इमारती आहेत. गावाशी संबंधित ग्रामसभा याची ठिकाणी घेतल्या जातात. गोटूलला आदिवासी समाजाचे न्याय मंदिर समजल्या जाते. कोठी येथे अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले लाकडांवर उभे असलेले गोटूल आहे. बदलेल्या काळानुसार या गोटूलसाठी इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी होत आहे. इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव अनेक वेळा ग्रामसभेत घेण्यात आला व तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला.
मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. कोठी येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक कदम यांनी कोठी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या विभागाच्या मार्फतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)