मार्र्कं ड्यातील मूर्त्यांकरिता म्युझियम बांधा

By Admin | Updated: March 15, 2015 01:13 IST2015-03-15T01:12:38+5:302015-03-15T01:13:37+5:30

चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्र्कंडादेव येथील मंदिरात प्राचीन काळातील शिल्पकलेचा नमुना मूर्ती रूपाने आजही अस्तित्त्वात आहे.

Build a museum for sculptures in Marc | मार्र्कं ड्यातील मूर्त्यांकरिता म्युझियम बांधा

मार्र्कं ड्यातील मूर्त्यांकरिता म्युझियम बांधा

मार्र्कं डादेव : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्र्कंडादेव येथील मंदिरात प्राचीन काळातील शिल्पकलेचा नमुना मूर्ती रूपाने आजही अस्तित्त्वात आहे. सदर मूर्त्या सुरेख व प्राचीन काळातील कलादर्शक आहेत. मात्र काही वर्षांपासून सदर मूर्त्या मंदिर परिसरात देखभालीअभावी अस्ताव्यस्त पडून आहेत. त्यामुळे मूर्त्यांकरिता म्युझियम बांधावे, अशी मागणी येथील भाविकांकडून होत आहे.
मार्र्कंडादेव विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. येथे महाशिवरात्रिनिमित्त भाविकांची आठ ते दहा दिवस गर्दी असते. या कालावधीतही सदर मूर्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होऊ शकत नाही. परिणामी या मूर्त्या दुरवस्थेत पडतात. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी म्युझियम बांधण्याची मागणी होत आहे.

Web Title: Build a museum for sculptures in Marc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.