शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM

नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

ठळक मुद्देठेंगण्या पुलामुळे अडते पावसाळ्यात वाट : कुंभी (मोकासा) व माडेमूल येथील गावकऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात वाट अडविणाºया पोटफोडी नदीवर उंच पूल बांधावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा माडेमूल व कुंभी (मोकासा) येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.माडेमूल व कुंभी ही दोन्ही गावे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहेत. या दोन्ही गावांना जाण्यासाठी पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. दुसरा कोणताही मार्ग नाही. गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने २००२ मध्ये सिमेंटचे पाईप टाकून पूल बांधून दिला. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी राहते. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास दीड ते दोन महिने पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. दोन्ही गावांना पोटफोडी नदी मार्गाशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. ठेंगण्या पुलावरून आजपर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. २०१६ मध्ये पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी वाहून गेला. यावर्षी सुद्धा २१ आॅगस्ट रोजी तिसºया वर्गात शिकणारा हेमंत किशोर निकुरे हा वाहून गेला. दुसºया दिवशी त्याचा मृतदेह विहिरगाव येथील पुलाखाली सापडला.नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. गावात चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवीपासून विद्यार्थी चांदाळा, गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. पावसाळ्यात मात्र या विद्यार्थ्यांची शाळा बुडते. गरोदर माता, लहान बालके यांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.यानंतरच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. याबाबत गावकरी जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहेत. पत्रकार परिषदेला सरपंच पुष्पा सोनुले, ग्रा.पं.सदस्य डिम्पल बांबोळे, विजय मडावी, तुळशिराम मेश्राम, यश्वगीता गेडाम, निवृत्ता नैताम, वैशाली सोनुले, रमेश कुमरे, हितराज बांबोळे, राकेश मोहुर्ले, अशोक मोहुर्ले यांच्यासह कुंभी व माडेमूल येथील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते.१५ दिवस उलटूनही नुकसानीचा पंचनामा नाहीअतिवृष्टीमुळे कुंभी व मोडेमूल येथील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कृषी सहायक, तलाठी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला नाही. कृषी सहायक व तलाठ्याचे या दोन्ही गावांमध्ये दर्शनच होत नाही. अनेकांना तर कृषी सहायक व तलाठ्याचे नाव सुद्धा माहित नाही. पंचनामे न झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.कुंभी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकºयांनी केली.