विदर्भासह अहेरी जिल्हा निर्माण करा
By Admin | Updated: August 29, 2015 00:07 IST2015-08-29T00:07:26+5:302015-08-29T00:07:26+5:30
अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून जारावंडी, जिमलगट्टा, कसनसूर, आसरअल्ली, कमलापूर व पेरमिली तालुक्याची निर्मिती करावी.

विदर्भासह अहेरी जिल्हा निर्माण करा
मागणी : जिल्हा संघर्ष कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन
अहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून जारावंडी, जिमलगट्टा, कसनसूर, आसरअल्ली, कमलापूर व पेरमिली तालुक्याची निर्मिती करावी. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी अहेरी जिल्हा संघर्ष कृती समिती, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवारी अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर अहेरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र उमरेकर यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अहेरी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इनाम शेख, अविनाश नल्लुरवार, अजय गोवंशी, दिनेश चावला, संतोष कुमरी, नागेश वेलादी, महेश सिडाम, मिलिंद मडावी आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
निवेदनातील मागण्या
हिवाळी अधिवेशनात शासनाने स्वतंत्र विदर्भासह अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करावी, अहेरी उपविभागातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी रस्ते, पूल आदींसह अनेक समस्या कायम आहेत. ंआलापल्ली-भामरागड मार्गाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात आहे, याला गती देण्यात यावी. याकडे शासनाने लक्ष द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.