बुद्धाचा धम्म हाच मानवतावादी जीवनमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:50 IST2017-09-24T23:50:24+5:302017-09-24T23:50:37+5:30
भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे.

बुद्धाचा धम्म हाच मानवतावादी जीवनमार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. म्हणूनच बुद्धाचा धम्म हाच खरा मानवतावादी जीवनमार्ग आहे, असे प्रतिपादन वर्धा येथील प्राचार्य डॉ. बी. एम. कºहाडे यांनी केले.
त्रिशरण नवयुवक मंडळ तथा बौद्ध समाज आणि यशोधरा महिला मंडळ मानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पीतांबर कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. के. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पीतांबर कोडापे मार्गदर्शन करताना म्हणाले, बुद्ध धम्म आदर्श समाजच नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मितीचीही दिशा निर्देश देतो. बुद्धाच्या शिकवणुकीत अष्ठांग मार्ग आहेत. हे आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवितात. त्यामुळे बुद्धाच्या धम्माची गरज आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला नामदेव मोरघडे, पेंदोर, डी. पी. मोरघडे, तुकाराम वैरकर, भाऊराव घोडमारे, भाष्करराव देऊळकर, अशोक चौधरी, रेखचंद भैसारे, संदीप टेंभुर्णे, भाष्कर उंदीरवाडे, शुभम सहारे, हेमंत सहारे, शिल्पा ढोरे, मृणाली ढवळे उपस्थित होते. संचालन प्रा. धनपाल टेंभुर्णे, प्रास्ताविक रेखचंद भैसारे तर आभार संदीप टेंभुर्णे यांनी मानले.