एटापल्ली येथे बीएसएनएलसेवेपोटी भुर्दंड
By Admin | Updated: March 5, 2017 01:23 IST2017-03-05T01:23:11+5:302017-03-05T01:23:11+5:30
एटापल्ली येथील बीएसएनएलसेवा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून

एटापल्ली येथे बीएसएनएलसेवेपोटी भुर्दंड
एटापल्ली : एटापल्ली येथील बीएसएनएलसेवा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून बीएसएनएलसेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेकवेळा फोन करून दुसऱ्या बाजुने आवाज येत नाही. ग्राहकाचे पैसे कटून जातात. बीएसएनएलने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयासमोर नवीन टॉवर एटापल्लीत उभारले. मात्र ते अजूनपर्यंत सुरू झाले नाही. कव्हरेजच्या समस्येने एटापल्ली वासीय कमालीचे त्रस्त आहेत.
भामरागड तालुक्यातील धोडराज, लाहेरी, कोठी व नारगुंडा येथे भारत दूरसंचार निगम लिमिटेडने टॉवर बसविले आहेत. मात्र मागील १० दिवसांपासून या परिसरातील डब्ल्यूएलएल, सीडीएमए सेवा बंद झाली आहे. याचा फटका स्थानिक जनतेसोबत या परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनाही बसत आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून सदर टॉवरची क्षमता वाढवावी, त्याचबरोबर सदर टॉवरमधील बिघाड दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)