संपामुळे बीएसएनएल सेवा विस्कळीत

By Admin | Updated: April 23, 2015 01:31 IST2015-04-23T01:31:40+5:302015-04-23T01:31:40+5:30

बीएसएनएल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या युनियन व असोसिएशनने संपूर्ण देशभरात २१ व २२ एप्रिलला लाक्षणिक संप पुकारला आहे.

BSNL service disrupted due to strike | संपामुळे बीएसएनएल सेवा विस्कळीत

संपामुळे बीएसएनएल सेवा विस्कळीत

गडचिरोली : बीएसएनएल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या युनियन व असोसिएशनने संपूर्ण देशभरात २१ व २२ एप्रिलला लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाला गडचिरोलीतही १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातील बीएसएनएलचे कार्यालय बंद होते. भारत सरकारने बीएसएनएलला दुर्गम भागात सेवा देण्याची सक्ती केली आहे. खासगी कंपन्यांना मात्र फक्त शहरी भागात व कमाईच्या ठिकाणी सेवा देण्याबाबत भूमिका घेतली आहे. सरकारच्या नितीमुळे बीएसएनएलला नवीन उपकरणे घेऊन सेवा देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. नवीन टॉवर लावण्यासाठीही उपकरणे प्राप्त होत नसल्याने सेवा कुचकामी ठरत आहे. उद्योजक धार्जीण्या सरकारी नितीमुळे हा प्रसंग उद्भवला आहे, अशी माहिती एस. एन. ई. ए. बीएसएनएल ईयू व एनएफटीईचे किशोर कापगते, एस. आर. वट्टमवार, ए. डी. कुलकर्णी, केशव वऱ्हाडे, निलेश कटकमवार, देवदास बोरकर, मनोहर सोरते आदींनी दिली आहे.

Web Title: BSNL service disrupted due to strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.