ग्रामीण जीवनातील वास्तव जगासमोर आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:18+5:302021-09-21T04:40:18+5:30

आदिवासी एकता युवा मंच गडचिरोली यांच्यावतीने क्रांतिवीर शंकरशहा आणि त्यांचे पुत्र कुंवर रघुनाथ शहा यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून ...

Bring the real life of rural life to the forefront | ग्रामीण जीवनातील वास्तव जगासमोर आणा

ग्रामीण जीवनातील वास्तव जगासमोर आणा

आदिवासी एकता युवा मंच गडचिरोली यांच्यावतीने क्रांतिवीर शंकरशहा आणि त्यांचे पुत्र कुंवर रघुनाथ शहा यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून १८ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, शाखा गोकुलनगर येथील प्रार्थना सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गुलाबराव मडावी, शिवनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अंजुम शेख, शिक्षिका मालती शेमले, पत्रकार हरीश सिडाम, कोठी ग्रामपंचायतच्या सरपंच भाग्यश्री लेकामी, आदिवासी विकास परिषदच्या युवा अध्यक्ष प्रतीक्षा सिडाम, गुरुदेव सेवा मंडळाचे शाखा अध्यक्ष सुखदेव वेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक गुलाब मडावी, अंजूमताई शेख यानी मार्गदर्शन केले. समाजाच्या विकासाकरिता सर्व संघटित होऊन कार्य करावे. जनकल्याणाकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा अभियंता प्रदीप कुलसंगे यांनी, संचालन गिरीश ऊईके तर, आभार मुकुंदा मेश्राम यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय मेश्राम, नथूजी चिमुरकर, शंकर गुरनुले, सुधीर मेश्राम, शकुंतला चिमुरकर व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

या मान्यवरांचा सत्कार

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये मोखाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मालती शेमले, पत्रकार हरीश सिडाम, कोठी ग्रामपंचायतच्या सरपंच भाग्यश्री लेकामी, आदिवासी विकास परिषदेच्या युवा अध्यक्ष प्रतीक्षा सिडाम यांचा शाल, ग्रामगीता, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Bring the real life of rural life to the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.