झुरी नाल्यावरील पुलाची दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:15+5:30
एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग ५० पेक्षा अधिक लहान मोठ्या गावांना जोडतो.

झुरी नाल्यावरील पुलाची दरड कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत.
एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग ५० पेक्षा अधिक लहान मोठ्या गावांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. याच मार्गावर झुरी नाला आहे. या नाल्यावर शासनाने उंच पूल बांधले आहे. त्यामुळे सदर पूल पावसाळ्यात बुडत नाही. मात्र या पुलाच्या एका बाजुची माती खचत चालली आहे. एकूण रस्त्याच्या पावभाग रस्ता खचला आहे. बांधकाम विभागाने सिमेंटच्या पोत्यांमध्ये माती भरून दरड बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र टाकलेली सिमेंटची पोते नाल्याच्या पात्रात कोसळली आहेत. वरची माती निघणे सुरूच आहे. वरून डांबर दिसत असल्याने रस्ता समजून एखाद्या वाहन चालकाने वाहन टाकल्यास ते वाहन सरळ नाल्याच्या पाण्यात कोसळण्याचा धोका आहे.
धोकादायक पूल लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गाने बसफेरी बंद केली आहे. बसफेरी बंद असल्याने प्रवाशी मिळत असल्याने खासगी प्रवाशी वाहने तसेच कार व इतर वाहने या पुलावरून ये-जा करतात. सदर पूल अतिशय धोकादायक आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून ही समस्या कायम आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या पुलाची डागडुजी करण्यात आली नाही. एखाद्या दिवशी वाहन नाल्याच्या पाण्यात कोसळून मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.