संचारबंदीतही लाचखाेरी तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:37 IST2021-07-31T04:37:25+5:302021-07-31T04:37:25+5:30
काेणत्याही व्यक्तीने लाच मागणे हा गुन्हा आहे. लाचेच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत विभागाची स्थापना केली आहे. जिल्हा ...

संचारबंदीतही लाचखाेरी तेजीत
काेणत्याही व्यक्तीने लाच मागणे हा गुन्हा आहे. लाचेच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत विभागाची स्थापना केली आहे. जिल्हा स्तरावार या विभागाचे कार्यालय आहे. काेराेनाच्या महामारीत अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला आहे. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विक्रीस मर्यादा येत आहेत. एकूणच संपूर्ण अर्थचक्र प्रभावित झाले आहे. या सर्व अडथळ्यांमधून नागरिक स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लाचेसाठी त्रास देण्याचे प्रमाण कमी हाेईल, अशी अपेक्षा हाेती मात्र ते झाले नाही. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे १४ सापळे रचण्यात आले असून, त्यात २० आराेपींना अटक करण्यात आली आहे. यावरून काेराेनाच्या या गंभीर वातावरणातही लाचखाेरीचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
वनविभागाचे सहा कर्मचारी अटकेत
काेराेनाच्या दीड वर्षांच्या कालावधीत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक वनविभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यासाेबतच पाेलीस-५, आराेग्य-२, महसूल-२, अभियंते-२, ग्रामसेवक-१, शिक्षण विभाग-१, खासगी इसम-१ यांचा समावेश आहे.
बाॅक्स
एक हजार रुपयांसाठी एसीबीच्या जाळ्यात
जिल्ह्यातील एक कर्मचारी केवळ एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जनतेची कामे वेळेवर करावी. यासाठी शासन गलेलठ्ठ पगार देते. काही अधिकाऱ्यांचा पगार एक लाखाच्या जवळपास आहे. तरीही गरीब जनतेकडून लाचेची मागणी करतात. ही अतिशय गंभीर बाब आहे.
जागृतीची गरज
ग्रामीण भागातील नागरिकांकडून माेठ्याप्रमाणात लाच स्वीकारली जाते. मात्र हे नागरिक सहजासहजी तक्रार करीत नाही. त्यामुळे लाचखाेरांचे फावत चालले आहे. तक्रारींचे प्रमाण वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.
बाॅक्स
वर्षनिहाय गुन्हे
२०१८-१३
२०१९-१४
२०२०-१४
२०२१-१४