शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

दि बुद्धिस्ट सोसायटीच्या सभेत विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया जिल्हा शाखेची बैठक गडचिरोली येथील संविधान सभागृहात पार पडली. या सभेत नवीन ...

गडचिराेली : दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया जिल्हा शाखेची बैठक गडचिरोली येथील संविधान सभागृहात पार पडली. या सभेत नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.

अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी अभियंता नरेश मेश्राम हाेते. प्रमुख अतिथी म्हणून त्रिरत्न समता संघाचे विजय बन्सोड, सोशल एज्युकेशनल मूव्हमेंटचे अशाेक गडकरी, धम्मानंद मेश्राम व धम्मराव तानादू उपस्थित हाेते. त्रिशरण-पंचशील ग्रहण करून सभेची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकानंतर २०२१ च्या भारताच्या जनगणनेत बौद्ध म्हणून नोंद करणे़, या विषयावर विजय बन्सोड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी अभियंता नरेश मेश्राम, उपाध्यक्ष ॲड. सोनाली मेश्राम, सिध्दार्थ साखरे, मुख्य सचिव धम्मराव तानादू, मुख्य संघटक हंसराज लांडगे, कोषाध्यक्ष विभा उमरे, प्रवक्ता म्हणून विजय बन्सोड, प्रसिद्धिप्रमुख दीपक बोलीवार तर सदस्य म्हणून सोपानदेव मशाखेत्री, प्रा. विनोद चहारे व प्रा. सुरेंद्र तावाडे यांची निवड करण्यात आली. गडचिरोली, अहेरी व देसाईगंज उपविभागीय कार्यकारिणी व संपूर्ण तालुकाध्यक्षांची निवड लवकरच करण्याचे ठरविण्यात आले. तथापि, सभेत कोरची तालुकाध्यक्षपदी आनंद मेश्राम, देसाईगंज तालुकाध्यक्षपदी नागोराव उके तर धानोरा अध्यक्षपदी खुशाल ढवळे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीत स्वीकृत सदस्य म्हणून भीमराव शेंडे, संगीता रामटेके, हेमंत मेश्राम, दर्शना शेंडे, यशोधरा नंदेश्वर, लता शेंद्रे, मिलिंद खोब्रागडे, सुरेश लोणारे व दर्शना मेश्राम यांना कायम करण्यात आले. सभेचे संचालन धम्मराव तानादू, प्रास्ताविक अशाेक गडकरी तर आभार धम्मानंद मेश्राम यांनी मानले.

बाॅक्स

२८ ला धम्मदीक्षा साेहळा

गडचिराेली तालुक्यातील मुरमाडी येथे २८ जानेवारीला धम्मदीक्षा सोहळा आयाेजित करण्यात आला आहे. या साेहळ्याला नागरिकांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.