मासिक सभेवर पदाधिकाºयांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:53 IST2017-08-25T00:53:18+5:302017-08-25T00:53:45+5:30
अनेकदा सूचना देऊनही विभाग प्रमुखांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गुरूवारच्या मासिक सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविले.

मासिक सभेवर पदाधिकाºयांचा बहिष्कार
अधिकाºयांची दांडी : कुरखेडाचे पंचायत समितीचे सदस्य संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : अनेकदा सूचना देऊनही विभाग प्रमुखांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गुरूवारच्या मासिक सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतीसह पदाधिकाºयांनी मासिक सभेवर बहिष्कार घालत सभागृहासमोर ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. कुरखेडा पंचायत समितीची सभा गुरूवारी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या सभेला तालुका कृषी अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी, देलनवाडी, कुरखेडा, मालेवाडा, पुराडाचे वनपरिक्षेत्राधिकारी, कढोली व मालेवाडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. याबाबत पदाधिकाºयांनी तीव्र रोश व्यक्त केला. अधिकारी मासिक सभेबाबत व विकास कामांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, असाही आरोप केला. विकास कामांमध्ये होणारी अनियमितता उघड करू नये, यासाठी अधिकारी गैरहजर राहत असल्याचा आरोप केला. सदर सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती गिरिधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, श्रीराम दुग्गा, संध्या नैताम, शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, वर्षा कोकोडे, कविता गुरनुले यांनी केली आहे.