गोठणगाव येथे मासिक सभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:16+5:302021-05-26T04:36:16+5:30
गट ग्रामपंचायत गोठणगाव येथे मीसार हे ग्रामसेवक आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर १७ फेब्रुवारी २०२१ ला नवीन पदाधिकारी पदारूढ झाले. या ...

गोठणगाव येथे मासिक सभेवर बहिष्कार
गट ग्रामपंचायत गोठणगाव येथे मीसार हे ग्रामसेवक आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर १७ फेब्रुवारी २०२१ ला नवीन पदाधिकारी पदारूढ झाले. या वेळी त्यांना ८ व १० फेब्रुवारी २०२१ ला ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामनिधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या व्यवहारात मोठी अनियमितता दिसून आली. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी कुरखेडा तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन चौकशी व कार्यवाही न झाल्याने संतप्त पदाधिकार्यानी १७ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची तयारी केली. मात्र लगेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ग्रामपंचायतला भेट देत पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्याने कुलूप उघडण्यात आले. मात्र, ग्रामसेवकावर काेणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. सरपंच संतोष हिचामी, उपसरपंच राम लांजेवार, ग्रामपंचायत सदस्य वीणा नाकतोडे, श्यामकला नैताम, ज्योत्स्ना कुथे, सविता हलामी यांनी मासिक सभेवर बहिष्कार घातला.