मासिक सभेवर सदस्यांचा बहिष्कार

By Admin | Updated: December 2, 2015 01:34 IST2015-12-02T01:34:45+5:302015-12-02T01:34:45+5:30

स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हे कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते.

The boycott of the monthly meeting | मासिक सभेवर सदस्यांचा बहिष्कार

मासिक सभेवर सदस्यांचा बहिष्कार

पत्रकार परिषद : बीडीओ गैरहजर राहत असल्याचा आरोप
चामोर्शी : स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हे कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते. परिणामी जनतेची कामे होत नाही. तसेच मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात बोलाविण्यात आलेल्या मासिक सभेलाही संवर्ग विकास अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे बीडीओंच्या गैरहजेरीच्या मुद्यांवरून सर्व पं. स. सदस्यांनी मंगळवारच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला.
कार्यालयात अनेकदा गैरहजर असणाऱ्या तसेच मंगळवारच्या मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चामोर्शी पं. स. च्या १० सदस्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेत अनेक पं. स. सदस्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या असंख्य तक्रारींचा पाडा वाचला. सतत गैरहजर राहणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, कार्यालयात गोंधळ असणे, संविधान दिवसाला स्वत: गैरहजर राहणे, असे प्रकार चामोर्शीच्या बीडीओंकडून वारंवार सुरू असल्याची माहिती पं. स. सदस्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पं. स. सदस्य प्रमोद भगत, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, सदस्य वर्षा भांडेकर, केशव भांडेकर, सुरेंद्र सोमनकर, रूपाली निखाडे, रमेश दुर्गे, सावित्री घरामी, कल्पना कोडाप आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The boycott of the monthly meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.