ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:20 IST2018-04-12T22:20:11+5:302018-04-12T22:20:11+5:30

धानोरा पंचायत समितीची आढावा सभा जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला.

Boycott meeting of Gramsevaks | ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार

ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार

ठळक मुद्देधानोरा पंचायत समिती : जिल्हा परिषद अध्यक्षांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा पंचायत समितीची आढावा सभा जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला.
११ एप्रिल रोजी गडचिरोली पंचायत समितीची आढावा सभा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. मात्र या सभेत ग्रामसेवकांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करून या कृतीच्या विरोधात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आढावा सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी धानोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा सभेवर ग्रामसेवकांनी बहिष्कार घातला. याबाबतचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सभांवर जरी बहिष्कार असला तरी इतर सभांना ते उपस्थित राहतील, असे म्हटले आहे. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत धानोरा पंचायत समितीची आढावा सभा पार पडली.

Web Title: Boycott meeting of Gramsevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.