दोन्ही एसटी आगार होणार मालामाल!

By Admin | Updated: October 9, 2014 23:01 IST2014-10-09T23:01:12+5:302014-10-09T23:01:12+5:30

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने

Both ST depot will be available! | दोन्ही एसटी आगार होणार मालामाल!

दोन्ही एसटी आगार होणार मालामाल!

८० लाखांचे उत्पन्न मिळणार : १२७ बसगाड्या अधिग्रहीत
गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने शासकीय तसेच खासगी व महामंडळाच्या बसगाड्यांना अधिग्रहीत करण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या मिळून या निवडणुकीसाठी जवळपास १२७ बसगाड्या घेतल्या जाणार आहेत. यातून गडचिरोली आगाराला जवळपास ६० लाख व अहेरी आगाराला जवळपास २० लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही आगार मालामाल होणार आहेत.
पोलीस विभागाने परिवहन महामंडळाच्या आगारांकडे निवडणूक प्रक्रियेसाठी सुरक्षा जवानांना मतदानस्थळी नेण्यासाठी १०० बसगाड्यांची मागणी केली आहे. यापैकी पोलीस विभागाने २९ व ३० सप्टेंबरपासून गडचिरोली आगाराच्या ४२ बसेस निवडणुकीच्या कामासाठी घेतल्या आहेत. यातून पोलीस विभागाकडून गडचिरोली आगाराला १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच पोलीस विभागाने अहेरी, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, वरोरा, राजूरा या आगाराच्या ५४ बसगाड्या अधिग्र्रहीत केल्या आहेत. सध्यास्थितीत गडचिरोली पोलीस विभागाकडे निवडणुकीच्या कामासाठी ९६ बसगाड्या अधिग्रहीत केल्या आहेत. गडचिरोली उपविभागीय कार्यालयाने निवडणुक मतदान प्रक्रियेसाठी गडचिरोली आगाराच्या २७ बसगाड्या तर देसाईगंज उपविभागीय कार्यालयाने २८ बसगाड्या अशा एकुण ५५ बसगाड्या गडचिरोली आगाराकडून अधिग्रहीत केल्या आहेत. या सर्व बसगाड्या १३ आॅक्टोबर पासून तर १६ आॅक्टोबरपर्यंत निवडणुक विभागाकडे राखीव राहणार आहेत. ५५ बसगाड्यांच्या वाहतुक सेवेच्या माध्यमातून निवडणुक विभागाकडून गडचिरोली आगाराला १२ लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. एकंदरीत निवडणुकीच्या निमित्ताने गडचिरोली आगाराला निवडणुक विभाग व पोलीस विभाग यांच्याकडून एकुण जवळपास ६० लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
नेहमी तोट्यात राहणाऱ्या महामंडळाच्या एसटीला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसगाड्या १३ ते १६ आॅक्टोबर दरम्यान जिल्हा निवडणुक व पोलीस विभागाच्या दिमतीला राहणार आहेत. देसाईगंज उपविभागीय कार्यालयाकडून गडचिरोली आगाराला बसगाड्यांच्या वाहतूकीसाठी सद्यास्थितीत १० लाख रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
अहेरी उपविभागीय कार्यालयाने निवडणुकीच्या कामासाठी अहेरी आगाराच्या ३१ बसगाड्या अधिग्रहीत केल्या आहेत. या सर्व बसगाड्या १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत अहेरी उपविभागीय कार्यालयाच्या सेवेत राहणार आहेत. ३१ बसगाड्यांच्या वाहतूकीतून अहेरी आगाराला उपविभागीय कार्यालयाकडून सरासरी १८ लाख ६० हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पोलीस विभागाने सध्या निवडणुकीच्या कामासाठी अहेरी आगाराच्या बसगाड्या अधिग्रहीत केल्या नाही. मात्र मतदानाच्या २ दिवसांपूर्वी पोलीस विभागाकडून अहेरी आगाराच्या गाड्या अधिग्रहीत केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता आगार प्रशासनाने व्यक्त केली आहे. बस वाहतुकीला वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने गडचिरोली व अहेरी आगार नेहमी तोट्यात राहते. या दोन्ही आगारांचा तोटा भरून निघण्यासाठी मार्र्कंडेश्वराची जत्रा, लग्नसराईचा मौसम व होणाऱ्या विविध निवडणुका महत्वपूर्ण ठरतात. अशा उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली व अहेरी आगार आपली आर्थिक घडी नीट बसवित असते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Both ST depot will be available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.