१६ कोटी ३९ लाखांचा बोनस वितरित
By Admin | Updated: November 28, 2015 02:30 IST2015-11-28T02:30:35+5:302015-11-28T02:30:35+5:30
गडचिरोली प्रादेशिक वनवृत्तांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली, भामरागड, ....

१६ कोटी ३९ लाखांचा बोनस वितरित
गतवर्षीचा तेंदू हंगाम : ७९ हजार ५८५ मजूर कुटुंब प्रमुखांना लाभ
गडचिरोली : गडचिरोली प्रादेशिक वनवृत्तांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली, वडसा या पाचही वन विभागात तेंदू संकलनाचे काम करणाऱ्या एकूण ७९ हजार ५८५ तेंदूपत्ता मजुराच्या कुटुंब प्रमुखांना १६ कोटी ३९ लाख ९४ हजार २९० रूपयांची रक्कम बोनसच्या स्वरूपात २६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत वितरित करण्यात आली.
२२ हजार ८३१ कुटुंब प्रमुख बोनसच्या प्रतीक्षेत
गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागांतर्गत गतवर्षी २०१४ मध्ये तेंदू संकलन केलेल्या एकूण १० लाख २ हजार ४१६ कुटुंब प्रमुखांना बोनसची रक्कम वितरित करावयाची होती. यापैकी ७९ हजार ५८५ कुटुंब प्रमुखांना बोनसची रक्कम वितरित करण्यात आली आहे. वर्षभरानंतरही २२ हजार ८३१ कुटुंब प्रमुख तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.