शेतकऱ्यांना बोनस रकमेचे वाटप

By Admin | Updated: July 30, 2015 01:20 IST2015-07-30T01:20:23+5:302015-07-30T01:20:23+5:30

सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती आरमोरीच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानावर प्रती ...

Bonus Amount Allocated to Farmers | शेतकऱ्यांना बोनस रकमेचे वाटप

शेतकऱ्यांना बोनस रकमेचे वाटप

२५० रूपये प्रतिक्विंटल : अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते वितरण कामाचा शुभारंभ
आरमोरी : सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती आरमोरीच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानावर प्रती क्विंटल २५० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले.
सदर बोनस वितरणाचा कार्यक्रम बुधवारी आरमोरी येथील शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बोनसचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांचे मार्फत आरमोरी सहकारी खरेदी-विक्री समितीच्या वतीने सन २०१४-१५ या पावसाळी खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत एकूण १३ हजार १७७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानावर २५० रूपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाकडून संस्थेला एकूण ३२ लाख ९४ हजार ३०० रूपयांचा निधी प्राप्त झाला. बोनस वितरणाचा शुभारंभ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते शंकरनगर येथील शेतकरी विश्वनाथ सोसी माझी यांना ९ हजार १०० रूपयांचा धनादेश देऊन करण्यात आला.
यावेळी सहकारी खरेदी-विक्री समितीचे सभापती महेंद्र मने, उपसभापती लक्ष्मण कानतोडे, संचालक संजय हेमके, खिरसागर नाकाडे व संस्थेचे व्यवस्थापक गणपती मने आदी उपस्थित होते.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानावर बोनस देण्याची शासनाची योजना फायदेशिर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे धानाची विक्री न करता खरेदी-विक्री संस्थेकडे करावी, जेणे करून बोनसचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
याप्रसंगी एकूण ४०९ शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे कर्मचारी गोपाल कंकटवार, कार्तीक खेडकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bonus Amount Allocated to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.