बोम्मावार बंधूंना ६ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 3, 2015 01:09 IST2015-05-03T01:09:30+5:302015-05-03T01:09:30+5:30
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे अध्यक्ष रोहित चरणदास बोम्मावार ...

बोम्मावार बंधूंना ६ पर्यंत पोलीस कोठडी
गडचिरोली : शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे अध्यक्ष रोहित चरणदास बोम्मावार व कोषाध्यक्ष सुरज बोम्मावार यांना गडचिरोली येथील विद्याभारती टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेटमेंट कॉलेजच्या गुन्ह्यात शनिवारी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ६ मे बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी लोकमतला दिली.
सावली येथील रोहित बोम्मावार व सुरज बोम्मावार यांनी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत गडचिरोली व चामोर्शी येथे तंत्र शिक्षण देणारी कॉलेज सुरू केले. गडचिरोली येथील विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट येथे क्षमतेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखवून आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आता पोलीस बोम्मावार बंधूंकडून शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करणार असून गुन्ह्याच्या कागदपत्रासंदर्भात तपासणी करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)