अरततोंडी येथील गुराख्याचा मृतदेह आढळला जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:43 IST2021-09-24T04:43:09+5:302021-09-24T04:43:09+5:30

मृत कृष्णा लोहंबरे हा गावातील गुरेढोरे चराईचे काम करत होता. बुधवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे गुरे घेऊन चराईकरिता गावाशेजारील जंगलात ...

The body of a cowherd from Arattondi was found in the forest | अरततोंडी येथील गुराख्याचा मृतदेह आढळला जंगलात

अरततोंडी येथील गुराख्याचा मृतदेह आढळला जंगलात

मृत कृष्णा लोहंबरे हा गावातील गुरेढोरे चराईचे काम करत होता. बुधवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे गुरे घेऊन चराईकरिता गावाशेजारील जंगलात गेला होता. सायंकाळी सर्व गुरे परत आली, मात्र कृष्णा परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. तेथील परिस्थिवरून विषारी सापाने दंश केला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पाठविला. मृताच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे.

230921\img-20210923-wa0069.jpg

मृतक क्रीष्णा लोहबंरे सर्पदंश

Web Title: The body of a cowherd from Arattondi was found in the forest