नदीत बुडालेल्या दुस-याही युवकाचा मृतदेह मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:29 IST2019-12-23T15:29:48+5:302019-12-23T15:29:58+5:30

महेश समय्या मादेशी (२७) असे त्याचे नाव आहे.

The body of another young man drowned in the river was recovered | नदीत बुडालेल्या दुस-याही युवकाचा मृतदेह मिळाला

नदीत बुडालेल्या दुस-याही युवकाचा मृतदेह मिळाला

आलापल्ली (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातून वाहणा-या प्राणहिता नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन तरूण मित्रांपैकी दुस-याही युवकाचा मृतदेह सोमवारी (दि.२३) मिळाला. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडला असून नावाड्यांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. महेश समय्या मादेशी (२७) असे त्याचे नाव आहे.

महेश आणि कुणाल परशुराम म्हशाखेत्री (२६) हे दोघेही फिरायला गेले असताना शनिवारच्या संध्याकाळी ते नदीपात्रात बुडाली होते. शोधमोहिमेदरम्यान कुणालचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शोधण्यात यश आले होते. सोमवारी महेश याचा ही मृतदेह मिळाल्याने दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे.

हे दोघेही मित्र आलापल्ली येथील रहिवासी होते. अहेरीचे पोलीस निरिक्षक प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: The body of another young man drowned in the river was recovered