सख्ख्या भावावर प्राणघात हल्ला

By Admin | Updated: May 31, 2017 02:12 IST2017-05-31T02:12:37+5:302017-05-31T02:12:37+5:30

जुनी वडसा येथील भारत नागोसे (४०) याच्यावर त्याचा सख्खा भाऊ चंद्रहास्य नागोसे (२६) याने प्राणघात हल्ला केला.

A bloody attack on his brother | सख्ख्या भावावर प्राणघात हल्ला

सख्ख्या भावावर प्राणघात हल्ला

जुनी वडसातील घटना : लग्नाच्या पंगतीत जेवताना झाले भांडण
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जुनी वडसा येथील भारत नागोसे (४०) याच्यावर त्याचा सख्खा भाऊ चंद्रहास्य नागोसे (२६) याने प्राणघात हल्ला केला. जखमी झालेल्या भारत याला ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जुनी वडसा येथे लग्न समारंभ होता. लग्नानंतर जेवणाची पंगत सुरू असताना भारत व चंद्रहास्य हे दोघेही जेवायला बसले होते. अन्न वाढणाऱ्या मुलांची बाचाबाची झाल्याने चंद्रहास्यने अन्नाची पत्रावळ रागाने फेकून दिली व तो घराकडे निघून गेला. जेवण आटोपल्यानंतर भारत हा सुध्दा घरी गेल्यानंतर दोघांमध्ये आणखी वाद निर्माण झाला. भांडणादरम्यान चंद्रहास्यने भारतला विळा फेकून मारहाण केली. यामध्ये भारतच्या डोक्याला व जबड्याला गंभीर दुखापत झाली. भरतला नगरसेवक सचिन खरकाटे व इतर नागरिकांनी देसाईगंज रूग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Web Title: A bloody attack on his brother