बुधवारी कोरचीत रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:24+5:302021-07-14T04:42:24+5:30
: लोकमत समूह, आरोग्य विभाग आणि विविध विभागांच्या पुढाकारातून कोरची येथे बुधवार दि.१४ रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. शहरातील ...

बुधवारी कोरचीत रक्तदान
: लोकमत समूह, आरोग्य विभाग आणि विविध विभागांच्या पुढाकारातून
कोरची येथे बुधवार दि.१४ रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी ११ वाजता या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सी.आर.भंडारी यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देवीदास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक, प्रा.चहारे उपस्थित राहणार आहेत.
कोरोना काळात कमी झालेले रक्त संकलन आणि त्यामुळे वाढलेली रक्त संकलनाची गरज लक्षात घेऊन लोकमतने सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरजूंना जीवनदान मिळावे कोरचीसारख्या छोट्या नगरातही हे शिबिर होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी या. उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होऊन रक्तदान करणार आहेत. या. सहभागी होण्याचे आवाहन कोरची येथील लोकमत प्रतिनिधी लिकेश अंबादे यांनी केले आहे.