जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी रक्तदान
By Admin | Updated: June 28, 2015 02:14 IST2015-06-28T02:14:31+5:302015-06-28T02:14:31+5:30
जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०१५ रोजी .....

जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी रक्तदान
गडचिरोली : जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०१५ रोजी गुरूवारी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई राहत असते. त्यामुळे रूग्णांना व नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने गडचिरोली येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नाव गडचिरोली लोकमत जिल्हा कार्यालय त्रिमूर्ती चौक येथे (९४२२१५२०१५, ०७१३२-२३३३९६) नोंदवावीत. (स्थानिक प्रतिनिधी)