लोकमत समूहातर्फे आज अहेरीत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:25+5:302021-07-14T04:42:25+5:30

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय ...

Blood donation camp in Aheri today by Lokmat Group | लोकमत समूहातर्फे आज अहेरीत रक्तदान शिबिर

लोकमत समूहातर्फे आज अहेरीत रक्तदान शिबिर

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, प्राचार्य गजानन लोनबले, भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात लोकमत सखी मंच, वेलकम फाउंडेशन, कर्तव्य फाउंडेशन, आलापल्ली व्यापारी संघटना, माँ विश्व भारती सेवा संस्था, पोलीस विभाग, वन विभाग, एफडीसीएम, सीआरपीएफ ९ बटालियन आणि सीआरपीएफ ३७ बटालियनचे जवान सहभागी होऊन रक्तदान करणार आहेत. या कार्यक्रमासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, लोकमतचे आलापल्ली प्रतिनिधी प्रशांत ठेपाले, अहेरी प्रतिनिधी विवेक बेझलवार व प्रतीक मुधोळकर, सखी मंच संयोजिका वैशाली देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Blood donation camp in Aheri today by Lokmat Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.