वडसात ८२ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:52 IST2017-09-01T23:52:29+5:302017-09-01T23:52:50+5:30

लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून विविधांगी अशा गणेशोत्सवास प्रारंभ झाला. त्यांच्या या संकल्पनेला शासनाकडूनही पूर्णत: प्रतिसाद मिळत आहे.

Blood donation of 82 people | वडसात ८२ जणांचे रक्तदान

वडसात ८२ जणांचे रक्तदान

ठळक मुद्देबाल गणेश मंडळाचा पुढाकार : सात वर्षांपासून सुरू आहे उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून विविधांगी अशा गणेशोत्सवास प्रारंभ झाला. त्यांच्या या संकल्पनेला शासनाकडूनही पूर्णत: प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही मोजक्या सार्वजनिक गणेश मंडळांनी रक्तदान, जनजागृती व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये देसाईगंज शहराच्या फवारा चौकातील बाल गणेश सार्वजनिक गणेश मंडळाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. या गणेश मंडळातर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविला.
देसाईगंज शहरातील येथील प्रतिष्ठीत व्यापारी तथा नगरसेवक गणेश फाफट यांनी सदर गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. रक्तदान करण्याची त्यांची ही २३ वी वेळ आहे. बाल गणेश मंडळातर्फे मागील सात वर्षापासून हा उपक्रम सातत्त्याने सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष आतीश पिल्लेवान यांच्या नेतृत्त्वात या मंडळातर्फे दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान तंबाखू व दारूमुक्तीबाबत जनजागृती केली जाते. शिवाय प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मंडळातर्फे विविध स्पर्धा घेतल्या जातात. महिलांसाठीही विविध उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. एकूणच देसाईगंज शहरात बाल गणेश मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या उपक्रमाला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Blood donation of 82 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.