अहेरीत ३५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:08+5:30

या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पुण्यतिथीनिमित्त दुपारी १२ वाजता बस डेपोमध्ये फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ३५ जणांनी रक्तदान केले. यात महिलांचाही सहभाग होता.

Blood donation of 35 people in Aheri | अहेरीत ३५ जणांचे रक्तदान

अहेरीत ३५ जणांचे रक्तदान

Next
ठळक मुद्देवंजारी समाजाचा पुढाकार : गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अहेरी व आलापल्ली येथील वंजारी समाजाच्या पुढाकाराने अहेरी येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
पुण्यतिथीनिमित्त दुपारी १२ वाजता बस डेपोमध्ये फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ३५ जणांनी रक्तदान केले. यात महिलांचाही सहभाग होता. शिबिराला जिल्हाध्यक्ष राजू खांडरे, जिल्हा सरचिटणीस अनिल बुटे, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सानप, आरएफओ अमोल केंद्रे, आगार व्यवस्थापक युवराज राठोड, आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य, नारायण नागरे, तालुकाध्यक्ष राजू नागरे, राजू जायभाये, मो. पठाण, राजेंद्र आव्हाड, दादाजी ढाकणे, त्रिवेणी हिवराळे, सुहास चवळे, भाऊराव बडवे, वासुदेव कंदीपुरवार, नामदेव गोपतवार, विलास कुंठे, वामन चिप्पावार, दयाराम रत्ने, सुहास बडे उपस्थित होते.
रक्त संकलनाकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उमाटे, रक्त संक्रमण अधिकारी सरिता वाघ, शिरीन कुरेशी, कीर्ति येनमवार यांच्यासह हेल्पिंग हँड्स संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 35 people in Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.