अहेरीत १०० रक्तदात्यांचे रक्तदान

By Admin | Updated: August 29, 2016 02:11 IST2016-08-29T02:11:01+5:302016-08-29T02:11:01+5:30

जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संप्रदाय तालुका अहेरीच्या वतीने

Blood donation of 100 donors in the horoscope | अहेरीत १०० रक्तदात्यांचे रक्तदान

अहेरीत १०० रक्तदात्यांचे रक्तदान

उपजिल्हा रुग्णालयात शिबीर : जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाचा पुढाकार
अहेरी : जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संप्रदाय तालुका अहेरीच्या वतीने रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १७ जवानांसह एकूण १०० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मिना, सीआरपीएफ क्रमांक ९ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी लव कुमार, अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, महेश मुक्कावार, मोनेश्वर हडपे, प्रोटोकॉल अधिकारी केशव बोेराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त १ लाख बॉटल रक्त संकलन करण्याचा कार्यक्रम राज्यभरात सुरू आहे. यापैैकी ५० हजार बॉटल रक्त भारतीय सैन्यांसाठी तर ५० हजार बॉटल रक्त महाराष्ट्र शासनाकडे देण्यात येणार आहे. माजी आ. दीपक आत्राम यांच्यासह सर्वच उपस्थित मान्यवरांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबाबत नरेंद्राचार्य संप्रदायाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने ते प्रत्येकाने करावे, असे सांगून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. सदर रक्तदान शिबिरात सीआरपीएफ क्रमांक ९ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी लव कुमार यांनीही रक्तदान केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्रचार्य महाराज संप्रदायाचे अहेरी तालुका अध्यक्ष विजय खरवडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका वर्षा ठाकरे, डॉ. निलिमा सिंह, जिल्हा निरीक्षक टी. एन. शेळके, रवींद्र ठाकरे, दिगू खतवार, प्रभाकर डोंगरे, दिवाकर मुक्के, यशवंत चंद्रगिरीवार, खाताळ, रक्त संक्रमण विभागाचे डॉ. बिश्वास, सरिता वाघ, शिरीन कुरेशी, गोपाल महतो, शरद बांबोळे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Blood donation of 100 donors in the horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.