अंध युवक-युवती विवाह बंधनात
By Admin | Updated: May 25, 2015 01:58 IST2015-05-25T01:58:51+5:302015-05-25T01:58:51+5:30
येथील अंध युवती मंदा कवडू डोर्लीकर हिचा विवाह उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील येरारी या गावातील गोपीचंद बाधम या अंध तरूणासोबत झाला आहे.

अंध युवक-युवती विवाह बंधनात
आष्टी : येथील अंध युवती मंदा कवडू डोर्लीकर हिचा विवाह उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील येरारी या गावातील गोपीचंद बाधम या अंध तरूणासोबत झाला आहे. लग्नामुळे दोघांच्याही जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
मंदा हिने दहावीपर्यंतचे शिक्षण वरोरा येथील अंध विद्यालयात घेतले. तिच्या सोबत शिक्षण घेतलेल्या लिला लाकडे व माया शर्मा या अंध तरूणींना मंदाच्या लग्नाविषयी चिंता वाटत होती. त्यांनी मंदासाठी दिल्ली येथील शिकवणी वर्गात शिक्षक असलेल्या अंध गोपीचंद बाधम यांच्यासोबत संपर्क साधला व लग्नाची बोलणी केली. गोपीचंदच्या मागणीनुसार मंदा हिला दिल्ली येथे नेऊन गोपीचंदसोबत भेट घालून दिली. संवाद साधल्यानंतर दोघेही लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर दोघांच्या आईवडीलांची भेट घडवून लग्न ठरविण्यात आले. २३ मे रोजी आष्टी येथे मंदाच्या वडिलाच्या घरी बौद्ध रितीरिवाजानुसार लग्न लावण्यात आला. सदर विवाह पार पाडण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील भारोसा येथील लहू मटाले या अंध युवकानेही सक्रीय भूमिका बजाविली.