ग्रामपंचायत आणि शाळेवर नक्षलवाद्यांनी फडकवले काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:56 IST2018-08-16T23:55:29+5:302018-08-16T23:56:16+5:30
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे.

ग्रामपंचायत आणि शाळेवर नक्षलवाद्यांनी फडकवले काळे झेंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे.
भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत आणि मन्नेराजाराम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर नक्षलवाद्यांनी काळे झेंडे लावल्याचे सकाळी दिसून आले. एवढेच नाही तर आरेवाडा ग्रामपंचायतच्या फाटकावर एक बॅनर लावून त्यात 'हे स्वातंत्र्य खोटे आहे. जे आपल्या अधिकारासाठी लढतात त्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकले जात आहे. १९४७ च्या स्वातंत्र्याचा निषेध करा', असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि शिक्षक जमले असताना हा प्रकार दिसला. त्यामुळे त्यांच्यात दहशत पसरली.