भाजपा राबविणार विकासपर्व अभियान
By Admin | Updated: June 11, 2016 01:34 IST2016-06-11T01:34:10+5:302016-06-11T01:34:10+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, ...

भाजपा राबविणार विकासपर्व अभियान
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर या योजनांचा किती नागरिकांनी लाभ घेतला, याचा आढावा घेण्यासाठी विकासपर्व महाअभियान राबविले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
केंद्र शासनाला दोन वर्ष व राज्य शासनाला दीड वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत जनतेच्या कल्याणाच्या विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या जाणार आहेत. चामोर्शी तालुक्यात ९, गडचिरोली तालुक्यात ५ व धानोरा तालुक्यात ४ सभा घेतल्या जातील, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. पत्रकार परिषदेला खा. अशोक नेते, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, सुधाकर येनगंधलवार, रमेश भुरसे, स्वप्नील वरघंटे, अनिल पोहणकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यादरम्यान खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. केंद्र शासनाने शेतकरी सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)