कुरखेडात भाजपची दुचाकीवरून तिरंगा रॅली :

By Admin | Updated: August 20, 2016 01:22 IST2016-08-20T01:22:41+5:302016-08-20T01:22:41+5:30

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण कायम राहावी,

BJP tricolor rallies on two-wheeler in Kurkheda: | कुरखेडात भाजपची दुचाकीवरून तिरंगा रॅली :

कुरखेडात भाजपची दुचाकीवरून तिरंगा रॅली :

कुरखेडात भाजपची दुचाकीवरून तिरंगा रॅली : देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण कायम राहावी, या उद्देशाने भाजपच्या वतीने कुरखेडा शहरासह तालुक्यात शुक्रवारी तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली. कुरखेडाच्या भाजप तालुका कार्यालयापासून या रॅलीची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या रॅलीमध्ये आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी डॉ. भारत खटी, विलास गावंडे, नाना नाकाडे, राम लांजेवार, रवींद्र गोटेफोडे, चांगदेव फाये, बबलू हुसैनी, अ‍ॅड. उमेश वालदे, रामहरी उगले, क्रिष्णा नरोटे, रामकृष्ण मुंगनकर व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: BJP tricolor rallies on two-wheeler in Kurkheda:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.