काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध

By Admin | Updated: July 25, 2016 01:31 IST2016-07-25T01:31:15+5:302016-07-25T01:31:15+5:30

देशाच्या विविध भागात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त करीत रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ....

The BJP-sponsored Central and the State Government's Prohibition by Congress | काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध

काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध

 निदर्शने : दलितांवरील अत्याचार, वाढत्या महागाईचा मुद्दा
गडचिरोली : देशाच्या विविध भागात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त करीत रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली व भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
गुजरातमध्ये गोहत्येवरुन दलितांवर अत्याचार झाले. मुंबईतही एका अल्पवयीन दलित मुलाची हत्या करण्यात आली. शिवाय मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आले. यावरुन भाजप सरकारच्या काळात दलित सुरक्षित नसून, हे सरकार दलितांबाबत दुजाभाव करीत असल्याची टीका यावेळी डॉ.नामदेव उसेंडी व आंदोलनकर्त्यांनी केली. निदर्शनेदरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. भाजपप्रणित राज्य सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढली आहे. अहमदनगर येथील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना झाली. या घटनेचा निषेध काँग्रेसने केला.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, लता पेदापल्लीवार, कुणाल पेंदोरकर, प्रभाकर वासेकर, पंचायत समिती सदस्य अमिता मडावी, नगरसेविका पुष्पा कुमरे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, एजाज शेख, नंदू वाईलकर, पी. टी. मसराम, टिपले, डोंगरे, रामटेके, विवेक घोंगळे, अभिजीत धाईत, प्रशांत इंगोले, सिध्दार्थ बांबोळे, राकेश गणवीर, पंकज बारसिंगे, वसीम पठाण, गौरव अलाम, सुमीत सिडाम, प्रतीक बारसिंगे, शाहरूख पठाण, चैतन्य अर्जुनवार, हेमंत भांडेकर, बाळू मडावी, प्रतीभा जुमनाके, निशा खवले, कैलाश कारमेंगे, वजीम खान, राजू कुळमेथे, आशा मेश्राम, श्रीराम मडावी आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: The BJP-sponsored Central and the State Government's Prohibition by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.