लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली होती, असा खळबळजक आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. भाजपने डमी उमेदवार म्हणून पुतणे अम्ब्रीशराव यांना माझ्याविरोधात उभे केले, पाच कोटी रुपये देखील खर्च केले होते, पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
भाजपच्या ताब्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शीत १२ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता नगरपंचायतच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जनकल्याण यात्रेनिमित्त सभा झाली.
...तर जि.प. स्वबळावर
अहेरीत इतर पक्ष आहेत कुठे ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढेल, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसाठी सर्व ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागांवर पक्ष लढेल, असे सांगून त्यांनी तिथे इतर पक्ष आहेतच कुठे, असा प्रश्न करुन भाजपसह काँग्रेस नेत्यांवर उपरोधिक टीका केली
Web Summary : NCP MLA Dharmaraobaba Atram alleges BJP spent crores, fielded a dummy candidate (his nephew) to defeat him in the assembly elections, but the public voted for him. He asserted NCP will contest independently if not given 32 of 51 Zilla Parishad seats.
Web Summary : राकांपा विधायक धर्मरावबाबा अत्राम ने आरोप लगाया कि भाजपा ने विधानसभा चुनाव में उन्हें हराने के लिए करोड़ों खर्च किए, एक डमी उम्मीदवार (उनके भतीजे) को मैदान में उतारा, लेकिन जनता ने उन्हें वोट दिया। उन्होंने जोर देकर कहा कि अगर 51 में से 32 जिला परिषद सीटें नहीं दी गईं तो राकांपा स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेगी।