भाजपतर्फे जिल्हाभरात केरळ सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:26 IST2017-10-09T23:26:03+5:302017-10-09T23:26:20+5:30
केरळ राज्यात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हत्या केली जात आहे.

भाजपतर्फे जिल्हाभरात केरळ सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केरळ राज्यात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हत्या केली जात आहे. याला केरळ सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप करीत केरळ सरकारचा भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, कुरखेडासह जिल्ह्याच्या विविध भागात निषेध केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून केरळ राज्यात राष्टÑपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात केरळ सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती आनंद श्रुंगारपवार, अल्का पोहणकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
चामोर्शी येथे केरळ सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, पं. स. सभापती आनंद भांडेकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे, नगर परिषद गटनेता प्रशांत येगलोपवार, महामंत्री विनोद गौरकार, उपाध्यक्ष जयराम चलाख, श्रोवण सोनटक्के, युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश कुकडे आदी उपस्थित होते.
धानोरा येथे भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ साळवे, को-आॅपरेटीव्ह बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, जि. प. सदस्य लता पुंगाटे, पं. स. सभापती अजमन राऊत, नगरसेवक सुभाष धाईत, विनोद निंबोरकर, नगरसेविका रेखा हलामी, गीता वालको, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ताराबाई कोटांगले, महामंत्री महादेव गनोरकर, बंडू म्हशाखेत्री, सुगंधा उईके, उपसरपंच नरेंद्र उईके, आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कुमरे, गजानन परचाके, प्रेमलाल वालको, श्रावण देशपांडे, संजय कुंडू, गणेश मुपतवार, भाऊराव कुमोटी, रमेश जराते, सारंग साळवे, पुंडलिक गावतुरे, लिलाधर राऊत, दिलीप गावडे, राकडे, शफी शेख, मधुकर उसेंडी, करीम अजानी, शेखर भोंडे उपस्थित होते.