भाजप पदाधिकाऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक

By Admin | Updated: June 11, 2015 01:50 IST2015-06-11T01:50:37+5:302015-06-11T01:50:37+5:30

तालुक्यातील वारंवार भेडसावणाऱ्या वीज समस्येला घेऊन येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कुरखेडाच्या महावितरण कार्यालयावर धडक देऊन

BJP office bearers fall on the MahaVitran office | भाजप पदाधिकाऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक

भाजप पदाधिकाऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक

कुरखेडा : तालुक्यातील वारंवार भेडसावणाऱ्या वीज समस्येला घेऊन येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कुरखेडाच्या महावितरण कार्यालयावर धडक देऊन तेथील उपविभागीय अभियंत्याशी चर्चा केली. लेखी निवेदन देऊन कुरखेडा तालुक्यातील वीज समस्या तत्काळ मार्गी लावण्याची एक मुख्य मागणी केली.
कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव, पळसगाव, वासी, कोसी व लगतच्या परिसरातील अनेक गावात विद्युत समस्या निर्माण होऊन या गावातील विद्युत पुरवठा अनेक दिवस बंद होता. अशीच परिस्थिती इतरही भागात आहे. पावसाळ्यात हिच परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाने योग्य नियोजन करून कुरखेडा तालुक्यातील वीज समस्येचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मागण्यांचे निवेदन कुरखेडा येथील प्रभारी उपविभागीय अभियंता रामटेके यांना देण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष विलास गावंडे, उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, अध्यक्ष राम लांजेवार, पं. स. सदस्य चांगदेव फाये, रामहरी उगले, जलालभाई सय्यद, उल्हास देशमुख, उपसरपंच रमेश बावनथडे, युसूफ पठाण, देवराव ठाकरे, मनिष शर्मा, नामदेव तुलावी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: BJP office bearers fall on the MahaVitran office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.