भाजपचे पदाधिकारी बुधवानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:27+5:302021-09-21T04:40:27+5:30
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला ...

भाजपचे पदाधिकारी बुधवानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सचिव संजय कोचे, डॉ. एस. एन. पठाण, बुधाजी सिडाम आदी उपस्थित होते. २०१४ पासून सलीम बुधवानी यांनी पुढाकार घेऊन भाजप अल्पसंख्याक मोर्चाला जिवंत केले. पण पक्षात डावलले जात असल्याने त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी नवे बळ मिळाले आहे.
बॉक्स
धर्मरावबाबांचे नेतृत्व पसंत
माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम हे जिल्ह्याचे मुरब्बी व वरिष्ठ नेते आहे. सर्व समाजाच्या घटकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची सवय असल्याने धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया बुधवानी यांनी दिली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार व संघटन मजबुतीसाठी नव्या जोमाने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.