भाजप अल्पसंख्यक आघाडीचा मेळावा

By Admin | Updated: May 26, 2016 02:25 IST2016-05-26T02:25:57+5:302016-05-26T02:25:57+5:30

भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक आघाडीच्या वतीने अल्पसंख्यक कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मे रोजी शनिवारला दुपारी ३ वाजता

BJP Minority Leadership Melava | भाजप अल्पसंख्यक आघाडीचा मेळावा

भाजप अल्पसंख्यक आघाडीचा मेळावा

शनिवारी आयोजन : योजनांची जनजागृती करणार,पदाधिकाऱ्यांची माहिती
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक आघाडीच्या वतीने अल्पसंख्यक कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मे रोजी शनिवारला दुपारी ३ वाजता येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे गडचिरोली-चंद्रपूर प्रभारी जुनेद खान व प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अल्पसंख्यक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्दिकी राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, डॉ. प्रकाश मालगावे, महम्मद आबिद सिद्दिकी आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अल्पसंख्यक समाजाच्या लाभार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती जुनेद खान यांनी दिली.
पत्रपरिषदेला सलीमभाई बुधवानी, आबिद अली, आबिद सिद्दिकी उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: BJP Minority Leadership Melava