ओबीसींकडून भाजप सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:25 IST2019-08-04T23:25:10+5:302019-08-04T23:25:46+5:30
ओबीसी आरक्षण व जिल्ह्यातील विविध समस्यासंदर्भातील येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव संतप्त झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरमोरीला येत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दरम्यान आरमोरी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही ओबीसी बांधवांना रविवारी स्थानबध्द केले.

ओबीसींकडून भाजप सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : ओबीसी आरक्षण व जिल्ह्यातील विविध समस्यासंदर्भातील येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बांधव संतप्त झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरमोरीला येत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दरम्यान आरमोरी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही ओबीसी बांधवांना रविवारी स्थानबध्द केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत पाच दौरे केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी जनतेला अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष होता. मुख्यमंत्र्यांना काळे झेडे दाखवून निषेध करणार, हे लक्षात येताच पोलिसांनी आरमोरी येथील कार्यकर्त्यांना स्थानबध्द केले. यामध्ये लारेन्स गेडाम, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, दिवाकर पोटफोडे, नरेंद्र गजभिये, पुरूषोत्तम मैंद, निलेश अंबादे, प्रविण ठेंगरी आदीचा समावेश आहे.
जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी रविवारी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे यांच्यासह अन्य एका कार्यकर्त्याला वांढरे यांच्या घरून त्यांना ताब्यात घेऊन दिवसभर पोलीस ठाण्यात स्थानबध्द ठेवले. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून धरपकड मोहीम राबविली. सकाही ९.३० वाजता पोलीस वांढरे यांच्या घरी पोहोचून त्यांना वाहनात बसवून ठाण्यात आणले.