गडचिरोली क्षेत्रात ९०हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:57+5:302021-02-05T08:53:57+5:30
गडचिराेली : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १६० जागांपैकी ९० हून अधिक ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने एकहाती ...

गडचिरोली क्षेत्रात ९०हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा
गडचिराेली : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १६० जागांपैकी ९० हून अधिक ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने एकहाती बहुमत प्राप्त केले असून, १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच विराजमान हाेतील, असा विश्वास आ. डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निकालाचा अहवाल भाजप प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्याकडे सादर केला. यावेळी विधान परिषदेचे आ. डॉ. रामदास आंबटकर, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, प्रशांत वाघरे,ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, प्रकाश गेडाम उपस्थित होते.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या श्रमाचे हे फळ असून, सर्वांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.