भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा

By Admin | Updated: April 9, 2016 00:39 IST2016-04-09T00:39:20+5:302016-04-09T00:39:20+5:30

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस बुधवारी गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली व मुलचेरा तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

BJP celebrates the day of celebration | भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा

भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा

विविध कार्यक्रम : सिरोंचा, अंकिसा, टेकडा, कालीनगर, एटापल्ली, खरपुंडी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
गडचिरोली/ सिरोंचा/ मुलचेरा/ एटापल्ली : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस बुधवारी गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली व मुलचेरा तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सिरोंचा तालुका मुख्यालयातील छोटा बाजार क्षेत्रात भाजप तालुकाध्यक्ष कलाम हुसैन यांच्या आयोजनात तर विठ्ठलेश्वर मंदिरासमोर शहर अध्यक्ष संदीप राचर्लावार, अंकिसा येथे तालुका प्रभारी अजय येनगंटी यांच्या आयोजनात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. छोटा बाजार येथे के. एस. बद्देला, विठ्ठलेश्वर मंदिरासमोर शंकर बुद्धावार, टेकडाताल्ला येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पेद्दीवार होते. तिन्ही ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार यांनी भाजपची राजकीय वाटचाल विशद करीत पक्ष स्थापनेची भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्ष राजू पेदापेल्ली यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावे, असे आवाहन केले. ३५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यकर्त्यांची भूमिका पार पाडणाऱ्या शंकर बुद्धावार यांचा शाल, श्रीफळ देऊन तसेच शिवशंकर अरगेलवार, दयानंद गादेवार, राकेश अलोणे, राजबाबू पिल्लीवार यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला रमजान खान, समय्या भंडारी, व्यापारी संघाचे अध्यक्ष विनय बुद्धावार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सत्यनारायण मंचालवार, सत्यानंदम गालिपेल्लीवार, मनोहर चकीनारपुवार, नागेश्वर गागापुरपू, शकुंतला येनगंटी, अशोक शामला, श्यामसुंदर मेचिनेनी, मदनय्या मादेशी, उपसरपंच शंकर लांचानी, संतोष पडालवार, मोहन गुडी, दिलीप सेनिगारपू, प्रकाश गणरपू, रमेश गोसगोंंडा, सम्मीरेड्डी येनगंटी आदी उपस्थित होते. संचालन माधव कासर्ला, श्रीनाथ राऊत, रमन पडिशालवार तर आभार अजय येनगंटी यांनी मानले.
विठ्ठलेश्वर मंदिरासमोर पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात वीरन्ना पडिशालवार, शंकर बुद्धावार, नारायण तोकला, लक्ष्मीनारायण संगेन, ब्रह्मानंदन कोत्तागट्टू, रामस्वामी मासर्ला, रामन्ना कडार्ला, ईश्वरम्मा बुद्धावार, किष्टय्या पेदापेल्ली, सत्यनारायण गौतम, रत्नम कोंडावार आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाला न. पं. पदाधिकारी उपस्थित होते.
मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथे भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण भरत विश्वास यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता होते. प्रमुख अतिथी म्हणून विधान वैद्य, निखिल हलदार, गणेश बंडावार, कोनू हलदार, जुडान बिश्वास, हिमांशू बरकंवाज, उपसरपंच हालदार, सुरपाम, कावळे, ढाली, सदानंद आचार्य, सुजीत मंडल, प्रभाकर नेवारे, वैद्यनाथ मंडल उपस्थित होते. कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विठ्ठल कोकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश भुरसे, सुधाकर नाईक, प्राचार्य डी. के. मेश्राम, श्रीकृष्ण कावनपुरे, जनार्धन साखरे, अरूण नैताम, रमेश नैताम, एकनाथ टिकले, दिनेश आकरे, सिद्धार्थ नंदेश्वर, जीवन नैताम, रामभाऊ टिकले, वसंत गव्हारे, ऋषी नैताम, भगवान बुरांडे, रोहित दुमाने, आनंदराव नैताम, वाल्मिक वासेकर, कमलेश खोब्रागडे, रामदास खेडकर, अनुसया मालखेडे, निर्मला खोब्रागडे, नीलकंठ नैताम, जैराम दुमाने, विनायक बारसागडे, मोरेश्वर नैताम, श्रावण गुरनुले उपस्थित होते.
वाकडी येथे श्यामराव मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बंडू झाडे यांनी शासनाच्या योजनांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशवंत झरकर, दिवाकर चौधरी, रवींद्र भोयर, योगेश चौधरी, बाबुराव चापले, रेवनाथ फटाले, कोविद रोहणकर, अमृत किनेकर, पीतांबर नरूले, गिरीधर म्हशाखेत्री, डंबाजी पुडके, नंदाजी वाकडे, तुळशीदास भोयर, उद्धव भोयर, सुभाष बांगरे, प्रभाकर चुधरी, बलराम मानकर, गोविंदा राऊत, गीता किन्हेकर, मीनकाबाई लडके, गुड्डी पुडके, उमाजी नागापुरे उपस्थित होते.
एटापल्ली येथे भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष नवीन बाला, शहर अध्यक्ष विजय नल्लावार, प्रसाद पुल्लूरवार, अशोक पुल्लूरवार, संदीप दंडिकवार, सचिन मोतकुरवार, निर्मला नल्लावार, सुनीता चांदेकर, रेखा मोहुर्ले, माया तलांडे, जया पुडो, महेश पुल्लूरवार, अनिल चिंतावार, राहूल गावडे, रमेश मट्टामी, सुरेश करमे, प्रशांत गजाडीवार, मयूर नामेवार व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: BJP celebrates the day of celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.