बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर साजरी
By Admin | Updated: April 17, 2016 01:13 IST2016-04-17T01:13:05+5:302016-04-17T01:13:05+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर साजरी
महामानवाला हजारोंची आदरांजली : जिल्हाभरात अनेक कार्यक्रमांतून मार्गदर्शन; भीम रॅलींनी गाव व शहर दुमदुमले
गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, समाज मंडळांच्या वतीने व्याख्यान, विविध स्पर्धा व उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल, गडचिरोली : मुख्याध्यापक बी. जी. कुंभरे, पर्यवेक्षक भोपये यांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात दंडकारण्य शिक्षण संस्थेचे सहसचिव भा. ना. मुनघाटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी भीमगीत, निबंध, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डी. जी. पिल्लेवान व शिक्षकांनी सहकार्य केले.
श्रीराम जन्मोत्सव समिती, गडचिरोली : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रा. सविता सादमवार यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामजयंती महोत्सवानिमित्त सामुदायिक प्रार्थनाही घेण्यात आली. यावेळी रामकृष्ण ताजणे, दिलीप उरकुडे, नत्थूूजी चिमुरकर, अशोक चिलबुले, संतोष आकनुरवार, बाबा नक्षिणे, लक्ष्मण अलाम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मुक्तावरम यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज कवठे, उल्हास बाटवे, अशोक शेडमाके, दिगंबर रामटेके, मंगेश काळबांधे, प्रांजली मुक्तावरम यांनी सहकार्य केले.
प्रबुद्ध बहुउद्देशिय बौद्ध समाज मंडळ, कॉम्प्लेक्स गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रबुद्ध बहुउद्देशिय बौद्ध समाज मंडळाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्कर मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. इंद्रजीत सांगोळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संशोधन अधिकारी चंदा मंगर, बारसिंगे, भानारकर, डोंगरे, अरविंद खोब्रागडे, जनगमवार, रूपचंद उंदीरवाडे, मेश्राम, आवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गेडाम तर आभार उके यांनी मानले. सायंकाळी देसाईगंज येथील बबन रामटेके यांच्या चमूद्वारा भीमगीत कार्यक्रम सादर करण्यात आले. रात्री सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शिक्षक कॉलनी, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. पी. गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. वेस्कडे, भीमराव वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान भीमगीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बुद्धवंदनाही घेण्यात आली. यशस्वीतेसाठी जी. के. बारसिंगे, डॉ. गेडाम, टी. के. खोब्रागडे यांनी सहकार्य केले.
अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, मुरमाडी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच. एम. चुधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून डी. एन. जांभुळकर, व्ही. टी. आखाडे, एन. बी. भोयर, पी. आर. मेश्राम, डी. डी. भोयर उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सी. डी. फुलझेले तर आभार एस. टी. कलसार यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाय. एम. भोयर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
स्वा. वि. दा. सावरकर आश्रमशाळा, चांदाळा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष हेमंत जंबेवार होते. यावेळी मुख्याध्यापक एस. ए. मुळे, वाय. टी. कुंभारे, शंकरवार, लांजेवार, सहारे, सूरकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुंभारे तर आभार शंकरवार यांनी मानले.
संजीवनी प्राथमिक शाळा, नवेगाव, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव एस. के. पोरेड्डीवार होते. यावेळी मुख्याध्यापक ठाकरे, चुटे, अंबादे, शाळा समिती अध्यक्ष श्रीकोंडावार, महल्ले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन येडालवार तर आभार किरमिरवार यांनी मानले.
जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गौतम डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका बी. जी. मडावी, विजय साळवे उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. डांगे यांच्याकडून डॉ. आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील पुस्तके भेट देण्यात आली. संचालन उके तर आभार प्रशांत तोटावार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. रश्मी डोके, डी. टी. कोहाडे, कोल्हटकर, इंदुरकर, कोरेवार यांनी सहकार्य केले.
शिवाजी सार्वजनिक वाचनालय, गडचिरोली : बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग म्हशाखेत्री होते. यावेळी सचिव जगदीश म्हस्के, दिलीप म्हस्के, देवराव म्हशाखेत्री उपस्थित होते. दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात ११ युवकांनी रक्तदान केले. संचालन भीमराव भैसारे तर आभार ग्रंथपाल रवींद्र समर्थ यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रियंका म्हस्के, प्रभाकर नरूले, प्रमोद सरकार, विनोद कुनघाडकर, सूचित काळे, अमोल खोब्रागडे, रूपेश हुलके, देवेंद्र मेश्राम यांनी सहकार्य केले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, एटापल्ली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डी. आर. कुळमेथे होत्या. कार्यक्रमात कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले. संचालन अंजली दासरवार तर आभार जयंती सुतार यांनी मानले. यशस्वीतेसाठी एम. के. आत्राम व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
जि. प. प्राथमिक शाळा, वासाळा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशांत मंडल होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारती मेश्राम, रामदास जौंजाळकर, संगीता लिंगायत, प्रमोद सेलोकर, धनराज वैद्य, अविनाश वऱ्हाडे, वैशाली धाईत, सोनाली कापकर उपस्थित होत्या. संचालन सुमित मंडल तर आभार सुजाता मेश्राम हिने मानले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली : कार्यक्रमाला ज्येष्ठ अधिव्याख्याता रवींद्र रमतकर, डॉ. विनीत मत्ते, डॉ. नरेश वैद्य, ग्रंथापाल जयराम डेरे, संजय मुनगंटीवार उपस्थित होते.
स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक विद्यालय तथा आश्रमशाळा, अनंतपूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य यू. व्ही. ढोके होते. यावेळी जी. आर. धोती, मंजूश्री मांडोळे, अधीक्षिका राऊत, व्ही. के. चव्हाण, आर. गोर्लावार, डी. वाय. तायडे, नरवाडे, चव्हाण, लडके, महादेव निकोडे, सतीश देठे, वासुदेव दुधबावरे, किरण दुधबळे, प्रमोद मुनगेलवार, अरूण बोरूले व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन आर. व्ही. नाकाडे यांनी केले.
कुरखेडा : तालुक्यातील आंधळी येथे आंबेडकर चौकात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच विनोद नैताम, सुरेंद्र भैसारे, बागडे, सोनवाने, पोलीस पाटील प्रकाश जनबंधू व नागरिक उपस्थित होते. येथील हायस्कूलमध्येही कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष भैसारे, मुख्याध्यापक बागडे, के. सी. मेश्राम, सोनवाने, म्हस्के उपस्थित होते. जि. प. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयातही बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिक्षक समिती, आरमोरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, आरमोरीच्या वतीने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल मुलकलवार होते. प्रमुख वक्ते म्हणून दीपक सेमस्कर, फिरेंद्र बांबोळे, दादाजी खरकाटे, माया दिवठे उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयंत राऊत, संचालन जीवन शिवणकर तर आभार संजय बिडवाईकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील चरडुके, मुख्याध्यापक सोमनकर, गुणवंत हेडाऊ, गुलाब मने, कैलास टेंभूर्णे, विठ्ठल होंडे, दीपक घोडमारे, संतोष मने व शिक्षकांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भेंडाळा : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून राजू सातपुते, नंदगिरवार, मदन मडावी, भारती सातपुते, धर्मशिला सहारे, मुख्याध्यापक नीलेश खोब्रागडे आदी उपस्थित होते. संचालन गराटे तर आभार कोवे यांनी मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिहीटेकला : कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिहिटेकला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिहिटेकलाच्या सरपंच ललीता बागतलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र घरमघाट, कवाडकर, मुख्याध्यापक टेकाम, माणिक कोराम, परिचारिका बांडे, सोमनानी, भूपेंद्र भंडारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष बेरूगवार, जेंगठे, जैलाल सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन टेंभूर्णे, प्रास्ताविक काटेंगे तर आभार कावळे यांनी मानले.
शिवसेना जिल्हा कार्यालय, गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यालयात साजरी करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या भीम रॅलीमधील भीम सैनिकांना शिवसेनेच्या वतीने सरबत वितरण करण्यात आले. तत्पूर्वी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार म्हणाले, बाबासाहेबांच्या राज्य घटनेमुळेच भारत देश एक संघ आहे. नव भारताचे बाबासाहेब खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन केले. यावेळी उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बघमारे, संदीप दुधबळे, युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस नरड, उपतालुका प्रमुख योगेश कुळवे, सुनील नक्षिणे, राहुल सोरते, प्रमोद बोबाटे, दर्शन पोगलवार, मिलींद भानारकर, संजय बोबाटे, महेश भुरले, श्यामराव बोबाटे, अमोल गेडाम, सचिन सुत्रपवार, राजू आकरे, राहुल लेनगुरे, आशिष नक्षिणे, आकाश नैताम, राजू गडपायले, गणेश मेश्राम, मिथून नैताम, यादव लोहंबरे, श्याम श्रीपदवार, सागर भांडेकर, सचिन नैताम, सोनू लाडे, प्रशांत सोरते, गणेश नैताम, दशरथ दुधबळे, प्रेमदास आदे, धनराज कुळवे व शिवसैनिक उपस्थित होते.
घोट : येथील स्मारक समितीच्या वतीने आंबेडकर चौकात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणूून जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, पतंजली योग समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, संजय वडेट्टीवार, पोलीस मदत केंद्राचे मोहन राजणे, वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील, बी. एन. पेटकर, प्रा. पी. के. कांबळे, गोवर्धन, अॅड. रत्नघोष ठाकरे, सदानंद खोब्रागडे, देविदास गणवीर, देवाजी गणवीर, स्मारक समितीचे अध्यक्ष बी. डी. तुरे, मुरलीधर देवतळे उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत बहुसंख्य बांधव सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सदानंद खोब्रागडे यांच्यातर्फे भोजनदान करण्यात आले. संचालन बंडू बारापात्रे, प्रास्ताविक व्ही. एन. पेटकर तर आभार प्रा. कांबळे यांनी मानले.
जोगीसाखरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. ध्वजारोहण कंत्राटदार धनपाल सोरते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आ. हरिराम वरखडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तंमुस अध्यक्ष सोपानदेव गेडाम, जनार्धन टेंभूर्णे, संदीप ठाकूर, पोलीस पाटील राधा सडमाके, ग्रा. पं. सदस्य मोरेश्वर नारनवरे, लक्ष्मी गरफडे, अनिता मडावी, कल्पना नारनवरे, मुख्याध्यापक खरकाटे, सुरेश मेश्राम, सदाशिव ढवळे, व्यंकट इंदुरकर, प्रेमानंद मेश्राम उपस्थित होते. संचालन प्रशांत टेंभूूर्णे, प्रास्ताविक इंदुरकर तर आभार रोहिदास शिम्पी यांनी मानले. धनपाल सोरते यांच्यातर्फे ग्रामस्थांना भोजनदान करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातही डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच नरेंद्र टेंभूर्णे होते. यावेळी केंद्रप्रमुख सोपानदेव गेडाम, कैलास खरकाटे, मुख्याध्यापक धोटे, चौधरी, मोरेश्वर नारनवरे, कल्पना नारनवरे, अनिता मडावी, लक्ष्मी गरफडे, भीमराव मेश्राम, नीलकंठ सहारे, व्यंकटराव इंदुरकर, दिलीप घोडाम, राजू सोरते उपस्थित होते.
अहेरी/आलापल्ली : बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अहेरी व आलापल्ली येथील भीम सैनिकांनी मिळून रॅली काढली. अहेरीच्या बुद्ध विहारापासून महागाव व त्यानंतर आलापल्ली येथून संपूर्ण रस्त्यांनी रॅली फिरविण्यात आली. या रॅलीत २०० हून अधिक दुचाकींवर ४५० भीम सैनिक सहभागी झाले होते.
ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळा, कुरखेडा : कार्यक्रमाच्या अध्यक्षानी शाळा समितीचे उपाध्यक्ष हिवराज पारधी होते. यावेळी मुख्याध्यापक भजने, इंदुरकर, चव्हाण, ढवळे उपस्थित होते. संचालन पी. डी. बोडणे यांनी केले. यावेळी यशोधरा प्रधान, चेतना धंचुकीया, नेपाली मैंद, पीयूष मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले.
श्रीराम आश्रमशाळा, घोटसूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय. जे. गडपायले होते. यावेळी रामगोनवार, मोहुर्ले, पिपरे, भोयर, उईके, सेलोटे, ए. एच. मुरांडे, नेमचंद खोब्रागडे, के. एस. खोब्रागडे, के. एस. खोब्रागडे, डी. के. पोटावी उपस्थित होते.
नगर पंचायत, एटापल्ली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार होत्या. यावेळी न. पं. उपाध्यक्ष रमेश गंपावार, पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले, नगरसेवक दीपक सोनटक्के, किसन हिचामी, मुख्याधिकारी आर. बी. मेश्राम, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी, सुनीता चांदेकर, तानाजी दुर्वा, रमेश मडावी, कोलेश मडावी, शंकर करमरकर, ज्ञानेश्वर रामटेके उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक शाळा, चिंतलपेठ : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष ताराचंद दुर्गे होते. उद्घाटन ग्रा. पं. सदस्य विलास चांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऋषी चांदेकर, देवेंद्र दुर्गे, मारोती मुंजमकर, प्रभाकर भडके, प्रवीण भडके उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश कवीराजवार, संचालन राजू आत्राम, ए. ए. शेख तर आभार व्यंकटेश मोतकुवार यांनी मानले.
आलापल्ली : येथील बौद्ध समाजाच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीपासूनच विविध कार्यक्रम घेण्यात आले. तीन दिवस बहुजनांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. १४ ला संघमित्रा बुद्ध विहारात व नागसेन विहारात बुद्धवंदना घेण्यात आली. रॅली तसेच भोजनदान करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास सरबत वितरण करण्यात आले.
ग्रामपंचायत विवेकानंदपूर : कार्यक्रमाला सरपंच ममता बिश्वास, तंमुस अध्यक्ष बादल शाहा, गोपाल मिर्झा, ज्योती सोनुले, कविता उईके, संजीता बिश्वास, निखिल कर, निखिल हलदार, विजय डोर्लीकर, नरेंद्र पेडूकर, रेखचंद मेश्राम, सुधाकर रामटेके, बंडू गोरडवार, मनोज मंडल, किशोर रामटेके, हरिदास कोंडागुर्ला, नारायण दुर्गम उपस्थित होते.
ग्रामपंचायत गेवर्धा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच टिकाराम कोरेटी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच संदीप नखाते, ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, तंमुस अध्यक्ष निजामुद्दीन शेख, ग्रामविकास अधिकारी अशोक धाबेकर, कृष्णा म्हस्के, अविनाश भनारे, दिनेश कावळे, रहीम पठाण, रोशन टेंभूर्णे उपस्थित होते.
मानवता प्राथमिक शाळा, देसाईगंज : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. सी. डोंगरे होते. यावेळी आर. आर. पत्रे, कल्पना कापसे, व्ही. आर. दहिवले उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. संचालन व्ही. सी. गायकवाड तर आभार सी. एस. चामलाटे यांनी मानले.
कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चातगाव : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. के. बोरकर होते. यावेळी एन. डी. पुसदेकर, प्रा. तडसे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नवघडे तर आभार व्ही. आर. नरड यांनी मानले.
विवेकानंद विद्यालय, मानापूर : बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. के. मेश्राम होते. यावेळी व्ही. सी. रहाटे, डी. डी. मैंद, आळे, बांगरे, ठेंगरी, बुरे, ए. पी. भेंडारकर, एच. बी. उसेंडी, वाय. बी. कावरे, आखाडे, बोळणे, फुलझेले, खोब्रागडे, शेंडे, वासेकर, आकरे, हलामी, वाढई, वाकडे, बांडे, पठाण, मळकाम उपस्थित होते. यावेळी डी. के. मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. संचालन पी. एन. खुणे तर आभार प्रा. ए. पी. जुआरे यांनी मानले.
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, गडचिरोली : गुरूदेव सेवा मंडळ व अंनिसच्या वतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य भाऊराव धकाते होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके, विलास निंबोरकर, पुरूषोत्तम चौधरी, शब्बीर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुरूषोत्तम ठाकरे, तर आभार निंबोरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी गजानन राऊत, विठ्ठल कोठारे, नीलकंठ मडावी, बाळासाहेब बाळेकरमकर, बारापात्रे यांनी सहकार्य केले.
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गेडाम होते. यावेळी उपप्राचार्य टिकले, प्रा. मेश्राम, प्रा. आस्वले, प्रा. शिवरकर, चिंतलवार उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन गजभिये तर आभार भीमराव सोरते यांनी मानले.
जा. कृ. बोमनवार विद्यालय, चामोर्शी : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे गुरूवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्र. सो. गुंडावार होते. प्रमुख अतिथी म्हणून ल. आ. दीक्षित, सचिव रवीशंकर बोमनवार, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रदीप सहारे, सहसचिव पल्लवी चव्हाण, पर्यवेक्षक डी. एस. रामटेके, एन. डब्ल्यू. कापगते उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्राजक्ता सातपुते, द्वितीय क्रमांक दीक्षांत मडावी, माध्यमिक गटात प्रथम क्रमांक दीक्षा बांबोळे, द्वितीय आर्या चांदेकर हिने फटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी प्रा. आय. आय. नागदेवते यांनी भीमगीत सादर केले. संचालन पी. बी. कन्नाके, ए. जे. लव्हात्रे तर आभार पी. एस. भांडारकर यांनी मानले.
पोलीस मदत केंद्र कारवाफा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम कारवाफा येथे साजरा करण्यात आला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी नितीन लकडे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश शिंदे यांच्या पुढाकाराने गावात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसही वितरित करण्यात आले. गावातून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस मदत केंद्राच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस मदत केंद्राच्या वतीने गावातील नागरिकांना भोजनदानही करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याने त्यांचे विचार अंगीकारावे, त्यांच्या कार्याची दखल युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुद्धा घेतली असल्याचे प्रतिपादन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)