वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी दुचाकी रॅली
By Admin | Updated: November 28, 2015 02:43 IST2015-11-28T02:43:08+5:302015-11-28T02:43:08+5:30
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.प. वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आरमोरी शहरात ...

वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी दुचाकी रॅली
प्रशंसनीय कार्य : एमजी महाविद्यालयाचा उपक्रम
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.प. वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आरमोरी शहरात प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून रस्ता व वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती केली.
सन २०१० ते २०२० हे दशक रस्ता व वाहतूक सुरक्षा दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अंतर्गत २०१५-१६ हे वर्ष रस्ते व वाहतूक सुरक्षा वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने समाजामध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जाणीव जागृती निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी रॅली काढण्यात आली. सदर मोटारसायकल रॅली प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा समन्वयक प्रा. नोमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात महाविद्यालय ते बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. रॅलीत प्रा. किशोर हजारे, प्रा. दिलीप घोनमोडे, प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. सतेंद्र सोनटक्के, प्रा. पराग मेश्राम, प्रा. विजय गोरडे, प्रा. डॉ. वसंता कहालकर, प्रा. मनोज ठवरे, प्रा. मोहन रामटेके, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, मोरेश्वर तागडे, प्रशांत दडमल, बाबुराव शेंडे, खुशाल रामटेके यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)