चौकशी करण्यास बीडीओंची ना!

By Admin | Updated: January 8, 2016 02:11 IST2016-01-08T02:11:00+5:302016-01-08T02:11:00+5:30

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गडचिरोलीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना ...

Bidi naa to inquire! | चौकशी करण्यास बीडीओंची ना!

चौकशी करण्यास बीडीओंची ना!

मौशीखांब दफनभूमीचे काम : वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली
गडचिरोली : नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गडचिरोलीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना मौशीखांब येथील दफनभूमीच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश ३० नोव्हेंबरला दिले होते. मात्र बीडीओंकडून या कामाची चौकशी अद्यापही झाली नाही.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील दफनभूमीची जागा रांगी मार्गावर प्रस्तावित आहे. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मनमर्जीने रांगी रोडवर दफनभूमीचे काम करण्याऐवजी मौशीखांब-गडचिरोली मार्गावर गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर दफनभूमीचे काम केले आहे. सदर काम अवैधरित्या होत असल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मौशीखांब येथील पाललाल सिडाम यांनी जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ५ नोव्हेंबर रोजी केली होती. मात्र बीडीओंकडून चौकशीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप सिडाम यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bidi naa to inquire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.