शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्राेल व डिझेल दरवाढीविराेधात काढली सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

गडचिराेली : दर आठवड्यात पेट्राेल व डिझेलच्या किमतीत वाढ करुन केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेची थट्टा चालविलेली आहे. वर्तमान स्थितीत ...

गडचिराेली : दर आठवड्यात पेट्राेल व डिझेलच्या किमतीत वाढ करुन केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेची थट्टा चालविलेली आहे. वर्तमान स्थितीत काेराेनामुळे आधीच महागाईची झळ साेसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीमुळे माेठा आर्थिक फटका बसत आहे. केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीचा निषेध नाेंदविण्यासाठी बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवार ५ फेब्रुवारीला गडचिराेली शहरातून सायकल रॅली काढून निषेध नाेंदविण्यात आला.

केंद्र सरकारकडून दर १० दिवसात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात येत आहे. ही बाब निंदनीय, दुखद व तेवढीच निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने २०२०-२१ या वित्त वर्षात दोनदा पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये व डिझेलवरील १६ रुपये वाढवून अनुक्रमे पेट्रोल ३२.९८ व डिझेल ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारले जात आहे. एवढेच नव्हे तर उत्पादन शुल्कासह, डिलरचे कमिशन ४ ते ५ रुपये, राज्याचा वॅट १५ ते २० रुपये भाडे व अन्य असा एकूण खर्च पकडून पेट्रोल, डिझेलची किंमत घेतलेल्या रकमेच्या किमान तिप्पट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर आर्थिक बाेजा पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने पेट्राेल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात खा. अशाेक नेते व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. सायकल रॅलीत विदर्भ प्रदेश सचिव डाॅ. कैलास नगराळे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी सदाशिव निमगडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतीक डांगे, जिल्हा काेषाध्यक्ष मिलिंद बांबोळे, महेश टिपले, जितेंद्र बांबोळे, प्रफुल रायपुरे, संघरक्षित बांबोळे, तुषार भडके, गोकुल ढवळे, हेमंत नैताम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

बाॅक्स

कराचा बाेजा सवलतीतून वसूल करावा

१ फेब्रुवारी २०१५ रोजी पेट्राेलचे दर ६५ रुपयापर्यंत हाेते. परंतु पेट्राेलचे दर शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. लगतच्या देशांमध्ये इंधनाचे दर कमी असताना भारतातच किंमती का वाढल्या, असा सवाल बीआरएसपीने केला आहे. पेट्रोल,डिझेल व गॅसवरचा विविध करांचा बोझा कमी करून इंधनांचे भाव कमी करावे. तसेच कराचा बोझा मंत्री, खासदार व आमदार यांना दिलेल्या विविध सवलतीमधून तो वसूल करावा, अशी मागणी बीआरएसपीने केली आहे.