अर्कापल्ली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:24+5:302021-02-23T04:54:24+5:30
अहेरी : ग्रामपंचायत कार्यालय, वेडमपली अंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा रस्ते निधीतून पोच मार्गासाठी ...

अर्कापल्ली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
अहेरी : ग्रामपंचायत कार्यालय, वेडमपली अंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा रस्ते निधीतून पोच मार्गासाठी ६१ लाख मंजूर झाले आहेत. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात ग्रामस्थांना चिखलातून ये-जा करावी लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागताे. येथील ग्रामस्थांनी गावात रस्ता बांधकाम करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केली हाेती. जिल्हा परिषदेने ही मागणी मंजूर केल्यानंतर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पंचायत समिती सदस्य सुरेखा आलाम, वेडमपलीचे सरपंच अजय मिसाळ, गोविंदगावचे उपसरपंच तिरुपती अल्युरी, जयराम आत्राम, व्यंकटी कावरे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.