कमलापूर-मोदूमडगू रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन

By Admin | Updated: December 23, 2016 01:04 IST2016-12-23T01:04:06+5:302016-12-23T01:04:06+5:30

कमलापूर-मोदूमडगू या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथून आवागमन करणे कठिण झाले होते.

Bhumibujan of Khamiragana road at Kamalapur-Modumdugu road | कमलापूर-मोदूमडगू रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन

कमलापूर-मोदूमडगू रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन

नागरिकांसाठी सोयीचे : त्रास कमी होणार
कमलापूर : कमलापूर-मोदूमडगू या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथून आवागमन करणे कठिण झाले होते. सदर मार्गाचे खडीकरण करावे, अशी मागणी वारंवार परिसराती नागरिकांकडून होत असताना प्रशासनाने दखल घेतली. नुकतेच या मार्गाच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच रजनीता मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
कमलापूर-मोदूमडगू मार्गाने नागरिक आवागमन करीत असतात. परंतु रस्ता कच्चा स्वरूपात असल्याने येथून ये-जा करताना अडचण येत होती. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून लक्ष वेधले होते. त्यामुळे नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एल. के. पाल, ग्रा. पं. सदस्य पार्वती आत्राम, किसन भट, संतोष ताटीकोंडावार, रवी मोगराम, संदीप रेपालवार, बकय्या चौधरी, सोमक्का कोडापे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Bhumibujan of Khamiragana road at Kamalapur-Modumdugu road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.