७ कोटी ८८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन
By Admin | Updated: December 2, 2015 01:14 IST2015-12-02T01:14:37+5:302015-12-02T01:14:37+5:30
तालुक्यातील रस्ते, पूल दुरूस्तीचे काम व नव्या लहान पूल व रस्त्यांच्या एकूण ७ कोटी ८८ लाख रूपये किमतीच्या सात कामांचे भूमिपूजन ....

७ कोटी ८८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन
रस्ते व पूल होणार : क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ
आरमोरी : तालुक्यातील रस्ते, पूल दुरूस्तीचे काम व नव्या लहान पूल व रस्त्यांच्या एकूण ७ कोटी ८८ लाख रूपये किमतीच्या सात कामांचे भूमिपूजन आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते मंगळवारी या एकाच दिवशी करण्यात आले.
आमदार क्रिष्णा गजबे यांनी मार्च २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी ८३ लाख रूपयांची चार कामे व नाबार्ड अंतर्गत २ कोटी ४८ लक्ष रूपयांचे तीन कामे मंजूर करवून घेतली. या सातही कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते मंगळवारी एकाच दिवशी करण्यात आला.
वघाळा - सायगाव - शिवणी -डोंगरगाव रस्ता दुरूस्तीच्या कामाचे भूमीपूजन शिवणी येथे करण्यात आले. दुसऱ्या रस्ता दुरूस्तीच्या कामाचे भूमीपूजन डोंगरगाव येथे करण्यात आले. ब्रह्मपुरी-आरमोरी-वैरागड - रांगी या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन लोहारा फाटा येथे करण्यात आले. कोरेगाव नजीकच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन कोरेगाव येथे करण्यात आले. पोर्ला-वडधा-कोरेगाव-पिसेवडधा मार्ग दुरूस्तीच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देलनवाडी येथे घेण्यात आला. मौशिखांब-वडधा-वैरागड- जोगीसाखरा मार्गावरील पुलाचे बांधकाम सालमाराजवळ तर मौशिखांब- वडधा- वैरागड - जोगीसाखरा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन जोगीसाखरा येथे करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य लंकेश भोयर, भाजपाचे पदाधिकारी भारत बावणथडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. पी. मार्लिवार, शाखा अभियंता ए. एम. गिरनाडे, आर. के. उरकुडे, आर. एम. देशकर, दुशांत साखरे, शिवणीचे सरपंच राजेश्वर ठाकरे, उपसरपंच पुरूषोत्तम दोनाडकर, डोंगरगावच्या सरपंच रंजना नार्देलवार, उपसरपंच भाग्यश्री ढोरे, नंदू पेटेवार, दुर्वेश भोयर, कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, उपसरपंच संदीप तुलावी, बाला गेडाम, ग्रामसेवक काशिवार, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, भाऊराव घोडमारे, वैशाली भैसारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)