जिंजगावात पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन

By Admin | Updated: October 13, 2016 02:58 IST2016-10-13T02:58:01+5:302016-10-13T02:58:01+5:30

तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Bhimipujan of the water tank building in Jijagao | जिंजगावात पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन

जिंजगावात पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन

पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणार : लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून होणार काम
भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प व लोक सहभागातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने विजयादशमीच्या दिवशी मंगळवारला तालुक्यातील जिंजगाव येथे ३० हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकी बांधकामाचे भूमिपूजन प्रस्तावित जागेत करण्यात आले. सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून जिंजगाव परिसरातील पाणीटंचाईची समस्या पूर्णत: मार्गी लागणार आहे.
जिंजगाव येथे जवळपास ९० घरांची लोकवस्ती आहे. पाणी टाकी बांधकामासाठी लोक वर्गणी काढण्यात आली. या लोकवर्गणीतून ३० लिटर क्षमतेच्या पाणीटाकीचे काम होणार आहे. मात्र नवीन मोठी विहीर व नळ पाईपलाईनच्या कामासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. सोलर पंपसाठीसुद्धा निधीची गरज आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी गावात गोटूल बांधकाम होणे आवश्यक आहे. लोकबिरादरी प्रकल्पामार्फत जून महिन्यात जिंजगावातील तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावाला सरोवराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जनतेच्या सहकार्यातून जिंजगाव सक्षम होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhimipujan of the water tank building in Jijagao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.